दिनांक.२७ एप्रिल २०२६ सोमवार
खरशिंदे : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
तालुक्यातील खरशिंदे येथील ज्येष्ठ महिला नागरिक कै. गंभा. पार्वताबाई किसन जगधने यांच्या निधनानंतर त्यांच्या दशक्रिया विधीचे आयोजन करण्यात आले असून हा विधी बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता खरशिंदे (पाझर तलाव) येथे पार पडणार आहे.
कै. गंभा. पार्वताबाई किसन जगधने या शांत, संयमी व कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिसरात आदराचे स्थान मिळवून होत्या. त्यांच्या साधेपणा, जिव्हाळा आणि माणुसकीच्या वागणुकीमुळे त्या गावातील सर्व स्तरांतील नागरिकांमध्ये परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दशक्रिया विधीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प. सौ. भागवताचार्य कान्होपात्रा ताई महाराज (श्री राधे राधे साई कुटीया आश्वी बुद्रूक) यांचे प्रवचन होणार असून, उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवंगत आत्म्यास शांती लाभावी, यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
कै. गंभा. पार्वताबाई किसन जगधने यांच्या पश्चात पुत्र, कन्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जगधने कुटुंबीयांनी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून विधीस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
