धुळे : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
मोराणे गावचे सुपुत्र गणेश सुनिल उफाडे यांनी युजीसी मान्यताप्राप्त, महाराष्ट्र शासन प्राधिकृत व पुणे विद्यापीठ आयोजित व्याख्याता पदासाठीची महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) समाजकार्य विषयात यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. या यशामुळे त्यांना महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठीची पात्रता प्राप्त झाली आहे.
सध्या गणेश उफाडे हे समता शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे येथे ‘कार्यक्रम अधिकारी’ म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी त्यांना ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ बहाल करण्यात आली होती. त्याअंतर्गत त्यांनी संस्थेचे संस्थापक प्रा. विलास वाघ यांच्या चरित्रलेखनास सुरुवात केली आहे.

गणेश उफाडे यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. जालिंदर अडसुळे यांना दिले असून ते म्हणाले, “डॉ. अडसुळे सरांचे मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळेच ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो.”गणेश उफाडे यांच्या या यशाबद्दल समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रा. उषाताई वाघ, सचिव डॉ. जालिंदर अडसुळे, कार्यकारी मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणेचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, प्रा. रचना अडसुळे, प्रा. सुनिता पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
