संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी आज सोशल मीडिया फेसबुकद्वारे एक जाहीर आवाहन करत राज्यभरातील यूट्यूब न्यूज पोर्टल संपादक आणि पत्रकार बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी सांगितले की, “आजच्या काळात आधुनिक चळवळीला सर्वात मोठी ताकद ही यूट्यूब चॅनेल्सने दिलेली आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर निर्भीडपणे जनमुद्दे मांडणारे हे चॅनेल्स समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत आहेत.”

केदार पुढे म्हणाले की, “आजच्या काळात कोणता मुद्दा दाखवायचा आणि कोणता दाबायचा, याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. पारंपरिक माध्यमांवर अनेकदा दबाव असतो, परंतु यूट्यूब आणि सोशल मीडियावर कोणाचाही दबाव चालत नाही. हाच या माध्यमाचा खरा बळ आहे.”
त्यांनी राज्यातील सर्व यूट्यूब संपादक आणि पत्रकारांना आवाहन केले की, “आपल्या चॅनेलचे तपशील, लिंक आणि संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा. जेणेकरून आपल्या आवाजाला आम्ही राज्यव्यापी व्यासपीठ देऊ शकू आणि आपल्या स्थानिक प्रश्नांना न्याय मिळवून देऊ शकू.”चॅनेल्सना जोडण्यासाठी संपर्क क्रमांक — 9970886966 असा देण्यात आला आहे.या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि जनतेच्या प्रश्नांवरील लढ्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास दीपक केदार यांनी व्यक्त केला.
“साथ द्याल, हीच अपेक्षा!” — या भावनिक आवाहनाने त्यांनी आधुनिक पत्रकारितेच्या लढ्याला नवा उर्जा दिला आहे.
