“राजकारण सोडून जर माणुसकी शिकायची असेल — तर एकदा अमोल खताळ साहेबांकडे बघा!”

“जनतेच्या सुखदुःखात नेहमीच सोबत राहणारा संवेदनशील नेता — आमदार अमोल खताळ”

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

घारगाव जनआक्रोश मोर्चात अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका

घारगाव येथे एका निष्पाप आदिवासी भगिनीवर जिहादी व त्याच्या परप्रांतीय साथीदाराकडून झालेल्या अमानुष सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला.

या मोर्चात हिंदू व आदिवासी बांधवांनी एकजुटीने सहभाग नोंदवून अन्यायाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. या सभेतून आमदार अमोल खताळ यांनी समाजबांधवांना संबोधित करत स्पष्ट शब्दांत सांगितलं “या अमानुष अत्याचाराविरुद्धचा लढा हा केवळ न्यायासाठी नाही, तर समाजातील प्रत्येक बहिणीच्या सन्मानासाठी आहे.” यावेळी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप, मा. श्री. मारुती मेंगाळ, मा. श्री. योगेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डिग्रस येथे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकली प्रगतीला भेट

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील कु.प्रगती श्रीराम या शालेय विद्यार्थिनीवर शाळेत जात असताना बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या कुटे हॉस्पिटल, संगमनेर येथे उपचार सुरू आहेत.

आमदार अमोल खताळ यांनी रुग्णालयात जाऊन कु.प्रगती व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली, धीर दिला, तसेच डॉ. प्रदीप कुटे यांच्याशी चर्चा करून उपचारांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी उपवनसंरक्षक अमरजीत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे, सागर केदार, मोहन ताम्हाणे, दादासाहेब कुटे, तसेच महा-यूतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खताळ साहेबांनी प्रशासनाला या प्रकरणात बिबट्यांच्या वाढत्या हालचालीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय भाजपा आमदार स्व.शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवाचे काल राहुरी येथील निवासस्थानी जाऊन आमदार अमोल खताळ यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबीयांना भेट देत सांत्वन केले. त्यांनी अक्षयजी कर्डिले व कुटुंबीयांना आधार देत म्हटलं — “शिवाजीरावसाहेबांचं कार्य, त्यांची माणुसकी आणि जनसंपर्क कधी विसरता येणार नाही. त्यांचं जाणं म्हणजे समाजाच्या एका मजबूत आधारस्तंभाचं पतन आहे.

“या प्रसंगी पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार संग्रामभैय्या जगताप, तसेच अनेक राजकीय व सामाजिक मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी मालदाड रोड, संगमनेर येथील लक्ष्मीबाई माधव सातपुते, कै. चैताली तुषार भूसारी

तसेच वडझरी येथील मुक्ताजी सुखदेव बोडखे

यांच्या दुःखद निधनानंतर संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला.

प्रत्येक ठिकाणी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली की “या आत्म्यांना शांती लाभो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.”

तसेच साकूर पठार भागातील भाजप महायुतीचे नेते श्री. बुवाजी भागाजी खेमनर यांच्या अचानक झालेल्या निधनाने अमोल खताळ साहेब अतिशय व्यथित झाले.

त्यांनी खेमनर कुटुंबीयांनाही भेट देत म्हटलं — “आपला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा परिवार आहे. बुवाजींसारख्या कार्यकर्त्याचं जाणं म्हणजे वैयक्तिक हानी आहे.

“जनतेच्या आनंदात सहभागी होणारा आणि दुःखात आधार देणारा नेता म्हणून आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचं उदाहरण घालून दिलं आहे. त्यांच्या कार्यशैलीत वैयक्तिक हितापेक्षा माणुसकी, सेवा आणि सहसंवेदना नेहमीच अग्रस्थानी राहिल्या आहेत.

💬 “राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसतं, ते माणसांच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी असतं” — या विचारांची प्रचिती अमोल खताळ यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते.

जनता दरबार – जनतेच्या अडचणींसाठी उघडं व्यासपीठ

आमदार अमोल खताळ यांनी अलीकडेच सुरु केलेल्या ‘जनता दरबार’ उपक्रमाद्वारे दर आठवड्याला शेकडो नागरिकांच्या तक्रारींवर थेट तोडगा काढला जात आहे. ग्रामविकास, शेतकरी अडचणी, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, रोजगार हमी, अपघात विमा, घरकुल, वीज, पाणी यासारख्या अनेक विषयांवरील समस्या ते प्रत्यक्ष ऐकून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थळावरच मार्गी लावत आहेत.

हा जनता दरबार केवळ समस्यांवर चर्चा करण्याचं ठिकाण नाही, तर जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देणारं व्यासपीठ बनलं आहे. अनेक गावांतील वृद्ध, महिला, शेतकरी आणि युवक सांगतात — “आमदार साहेबांना भेटण्यासाठी परवडणं अवघड नाही, कारण तेच आमच्याकडे येतात.”

💬 खताळ साहेबांची भूमिका :

“नेतृत्व म्हणजे लोकांच्या डोळ्यातला विश्वास टिकवणं. जनतेच्या घरात दु:ख असेल तर नेता घरात शांत बसू शकत नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!