थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 10% वेतन वाढ

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

थोरात कारखान्याने कायम सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून मागील हंगामामध्ये 3200 प्रति टन भाव दिला आहे. याचबरोबर कामगारांना वेळेत पगार व 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिवाळीनिमित्त दिली असून 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना 10 टक्के वेतन वाढ देण्यात येणार असल्याचे मा कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगाम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा.आ.डॉ.सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले, सौ.कांचनताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, लहान भाऊ गुंजाळ, शंकरराव खेमनर,सौ.मीराताई शेटे,संचालक संतोष हासे,इंद्रजीत खेमनर,डॉ.तुषार दिघे, सतीश वर्पे, संपतराव गोडगे,विनोद हासे, अरुण वाकचौरे,रामदास धुळगंड, अंकुश ताजने, गुलाबराव देशमुख, विलास शिंदे, नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे,दिलीप नागरे, विजय राहणे, सौ. लताताई गायकर, सौ.सुंदरबाई रावसाहेब डूबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे.अत्यंत स्वच्छ व पारदर्शक काम करताना उंचाकी भाव दिला आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे धरणे भरली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करताना एकरी 100% ऊस उत्पादन घेतले पाहिजे.दीपावली निमित्त कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांनी मोठी मदत केली यातून बाजारपेठ फुलली. राज्य शासनाच्या नियमानुसार कारखान्याने कायम ऊस उत्पादकांचे वेळेत पेमेंट व कामगारांचे वेळेत वेतन दिले आहे.

राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार 1 जानेवारीपासून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 10 टक्के वेतन वाढ दिली जाणार आहे. या निर्णयामुळे कारखान्याच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व कामगार व सभासद यांनी कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!