ऊस उत्पादकांना नवी उभारी! पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ — उच्चांकी गाळपाचे लक्ष्य!

प्रवरानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या प्रसंगी कारखान्याने विस्तारित प्रकल्प उभारून गाळप क्षमतेत वाढ केली असल्याची माहिती देण्यात आली. यंदा उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील होते. या वेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. भास्कराव खर्डे, श्री. नंदूशेठ राठी, श्री. शिवाजीराव जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगत दिशेने वाटचाल करत असून, शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या गळीत हंगामात “प्रवरानगरी”तून ऊस उद्योगाला नवी ऊर्जा आणि दिशा मिळणार, असा विश्वास शेतकरी वर्गाने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!