होळकरवाडा (रंगमहाल) येथे राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५चा भव्य बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न

चांदवड : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

“जागर शिवशाही ते होळकरशाही” या उपक्रमांतर्गत भारतीय इतिहास प्रबोधिनी, मुंबई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ चा भव्य बक्षीस वितरण समारंभ चांदवड येथील ऐतिहासिक होळकरवाडा (रंगमहाल) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. देवीदास पोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत राजे नानासाहेब होळकर, श्रीमंत मुकुंदराजे होळकर, डॉ. रमिला गायकवाड (मुंबई), प्राचार्य अन्वर शेख (बीड), डॉ. रमेश पिसे (नागपूर), डॉ. प्रेरणा राऊत (पालघर), डॉ. तुषार चिंचोले (नाशिक), प्राचार्य दत्तात्रय बारगळ, प्रा. डॉ. सुरेश पाटील, राजीव हाके (धुळे), समाधान बागल, सुभाष पवार (सहाय्यक मॅनेजर), डॉ. वर्षा चौरे, प्रा. सुभाष वाल्हेकर (त्र्यंबकेश्वर) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत राजे नानासाहेब होळकर आणि श्रीमंत मुकुंदराजे होळकर यांच्या हस्ते नगरपरिषद येथील शिवप्रतिमेचे पूजन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजगादी पूजन व महाआरतीने झाली.

विजेते विद्यार्थ्यांनी होळकरशाही आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. या वक्तृत्व स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

विजेत्यांमध्ये राजनंदीनी पडार, काशीका म्हात्रे, प्रणव जाधव, विश्वराज पाटील, प्रतिक्षा बंदगड, शुभम खरात, प्रो. स्नेहा महांबरे, अजय सकटे, नेहा जाधव, रणरागिणी शिंपले आदींचा समावेश होता. अनुपस्थित विजेत्यांना पारितोषिके पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाडवी (बाळा) यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. वर्षा चौरे यांनी मानले. या प्रसंगी शहरातील अनेक महिला मंडळ सदस्य, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!