संगमनेरवर थोरातांचे निर्विवाद वर्चस्व; नगरपरिषदेत पुन्हा एकदा ‘थोरात वर्चस्व’

राजकारण आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत अशी ओळख असणाऱ्या संगमनेर तालुक्याने आपली झालेली चूक दुरुस्त करत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून सेवा समितीच्या 27 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. याचबरोबर राज्यातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवार डॉ. मैथिली सत्यजित तांबे ठरल्या आहेत. यामुळे संगमनेर हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका सततच्या विकास कामातून समृद्ध बनवला. सलग आठ वेळेस विक्रमी मताधिक्याने या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना संगमनेरचा देशात लौकिक वाढवला. मात्र मागील विधानसभेमध्ये महाराष्ट्राला खंत वाटणारा निकाल लागला. आणि याची खंत संपूर्ण संगमनेर तालुक्यातील जनतेला कायम होती. मागील एक वर्षांमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये वाढलेली अमली पदार्थांची तस्करी दहशत गुंडागिरी फ्लेक्स बाजी यामुळे संगमनेर तालुक्यातील जनता वैतागली होती.

सुसंस्कृत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे राजकारण ही ओळख असणाऱ्या संगमनेर तालुक्याने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. राज्यभरातून लक्ष असलेल्या संगमनेर नगरपालिकेतून डॉ मैथिली तांबे ह्या 16777 मतांनी विजयी झाले असून सेवा समितीचे 30 पैकी 27 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यामुळे विखे खताळ गटाला मोठी चपराक मिळाली आहे.

खताळ गटाने प्रचारासाठी पूर्ण ताकद लावली. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री, शिंदे सेनेचे खासदार यांना संगमनेर मध्ये बोलावले. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. याउलट संगमनेर मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी बाजीप्रभू ठरत एक हाती खिंड लढवली. त्यांना आमदार सत्यजित तांबे यांनी मोठी साथ दिली. याचबरोबर आ.सत्यजित तांबे यांचे अचूक नियोजन आणि संगमनेर 2.0 चे व्हिजन संगमनेरकरांना भावले. डॉ. मैथिलीताई तांबे या उच्चशिक्षित उमेदवार असून थोरात तांबे घराण्याचा वारसा समर्थ पुढे चालवतील हा विश्वास जनतेला होता.

आजच्या या विजयाने संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे याचबरोबर संगमनेर नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता जनतेने लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात दिली आहे.

तरुणाईचा अभूतपूर्व जल्लोष

संगमनेर सेवा समितीचे 30 पैकी 27 नगरसेवक व नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर संगमनेर मधील तरुणाईने शहरांमध्ये मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, डीजे, भव्य मिरवणूक हे या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. सर्व समाजाचे आणि सर्व संघटनांचे लोक एकत्रित सेवा समितीच्या नेतृत्वामध्ये हा अभूतपूर्व विजय मिळवला असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!