जय हनुमान सप्ताह आश्वी बुद्रुक येथे भाविकतेचा महासागर उसळणार!

आश्वी बुद्रुक (प्रतिनिधी) : आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे भाविकतेचा दरवळ पसरवणारा “जय हनुमान सप्ताह” दिनांक ३० जुलै २०२५ ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचे आयोजन हनुमान मंदिर व भक्तपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. भक्तांसाठी ही एक अध्यात्मिक पर्वणीच ठरणार आहे.

🌺 सप्ताहाचे मुख्य आकर्षण –सप्ताहात ह.भ.प. नामवंत कीर्तनकार आपल्या भक्तिगीते, प्रवचने, हरिपाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून संतसाहित्य, रामभक्ती, व जनप्रबोधनाचे अमृत भक्तांच्या हृदयात ओततील.

दैनंदिन कार्यक्रम व कीर्तनकार – बुधवार ३०/०७/२५ – ह.भ.प. साक्षी ताई सोडनर (साकूर), किर्तन सौजन्य. भागवत विठोबा खेमनर.

गुरुवार ३१/०७/२५ – ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के (बाभळेश्वर), किर्तन सौजन्य. वेणूनाथ तात्याबा गायकवाड.

शुक्रवार ०१/०८/२५ – ह.भ.प. रामकृष्ण महाराज सानप (सत्यगाव येवला), किर्तन सौजन्य. सुभाष यादव म्हसे.

शनिवार ०२/०८/२५ – ह.भ.प. भागवताचार्य बाबा महाराज खामकर (खडकवाडी), किर्तन सौजन्य. काशिनाथ लिंबाजी जऱ्हाड.

रविवार ०३/०८/२५ – ह.भ.प. गणेश महाराज शिंदे (उदापूर, किल्ले शिवनेरी), किर्तन सौजन्य. संपत मारुती ताजणे (मेजर) व रघुनाथ गजबा जाधव (शिबलापूर).

सोमवार ०४/०८/२५ – ह.भ.प. गणेश महाराज एरंडे (झोळे), किर्तन सौजन्य. गं.भा. नंदाबाई वाघमारे.

मंगळवार ०५/०८/२५ – ह.भ.प. दत्तगिरी महाराज (वरवंडी), किर्तन सौजन्य. अशोक गोविंद जऱ्हाड व रामनाथ वेणूनाथ जऱ्हाड

📌 महाप्रसाद व ग्राम प्रदक्षिणा –सप्ताहाच्या समारोपदिनी बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी १० वा. पासून ग्रामप्रदक्षिणा व दुपारी १२ वाजता ह.भ.प. अनंत महाराज काळे (संगमनेर) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसाद वितरण होईल.

🙏 विशेष सहभाग व आयोजन –संपूर्ण सप्ताहात गावातील महिला मंडळ, युवक मंडळ, गणेश मंडळ, कीर्तन मंडळ व विविध धार्मिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून, आयोजनात समस्त ग्रामस्थ आधी बु. यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.हा सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सामाजिक एकात्मता, श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक मूल्यांचा संगम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!