संलग्न पोलीस कर्मचारी तात्काळ सोडावेत, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा — लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्रचा इशारा

परभणी (प्रतिनिधी) :

परभणी पोलीस विभागात कार्यरत असलेल्या संलग्न पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. असा ठाम इशारा लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र या संस्थेने दिला आहे. दिनांक 01 जुलै 2025 रोजी संस्थेचे प्रतिनिधी मंडळ पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप (नांदेड परिक्षेत्र) यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र अद्याप या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी, संस्थेच्या वतीने दुसऱ्यांदा 16 जुलै 2025 रोजी लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला की, 30 जुलै 2025 पर्यंत संलग्न कर्मचारी सोडले गेले नाहीत, तर नांदेड येथील पोलीस विभागासमोर उपोषण करण्यात येईल.

संलग्न कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. यामुळे इतर कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही व आस्थापनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे स्पष्टपणे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “संलग्न कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणताही स्पष्ट कायदा नाही, तरीदेखील ही नियुक्ती सातत्याने सुरू आहे, हे अन्यायकारक आहे,” असे संस्थेचे म्हणणे आहे.या निवेदनावर लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष व लोकश्रेय न्यूजचे संपादक सलीम इनामदार, निवृत्ती नितनवरे, विजय पानबुडे, डॉ. सुनिल जाधव, अशोक उगळे आदींच्या सह्या आहेत.

या निवेदनाची प्रत पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आली आहे.

1. मा. मुख्यमंत्री व गृह मंत्री मा. देवेंद्र फडणवीस

2. गृह राज्यमंत्री मा. पंकज भोयर

3. पोलीस महासंचालक,

मुंबईलोकश्रेय मित्र मंडळाने घेतलेला हा मुद्दा कर्मचाऱ्यांमधील अन्यायाविरोधात उभा राहत लोकशाही मार्गाने लढा देणारा आहे. पुढील काळात पोलीस प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!