धानोरी प्रतिनिधी – दत्तात्रय घुले | दिनांक – 27 जुलै 2025
कोपरगाव तालुक्यातील ओगदी (जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी तुकाराम नारायण सोनवणे (वय 65 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
ते आपल्या प्रामाणिक मेहनत, शेतीतील नवनवीन प्रयोगशीलता व सामाजिक ऋणानुबंधासाठी ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा एकत्रित मोठा कुटुंबीय परिवार असून, त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोरक्षनाथ तान्हाजी वाघ (नांदेसर, आडगाव, ता. येवला) हे त्यांचे मेव्हणे असून, त्यांचे ते मामा होते.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
“ज्यांच्या विचारांनी, कष्टांनी अनेक पिढ्यांना दिशा दिली,
अशा व्यक्ती शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी त्या आठवणींमध्ये सदैव जिवंत राहतात…”
शांतात आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
