नाशिक (प्रतिनिधी) : जुने नाशिक येथील प्रभाग क्र.14 अंतर्गत नागसेन नगर व वडाळा नाका परिसरात शिवसेना युवा सेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या गरजा ओळखून हा उपक्रम राबवण्यात आला.

हा उपक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार मा. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. त्यांच्या दूरदृष्टीतून नाशिक महानगरपालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये लोकहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

या छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना नाशिक महानगरप्रमुख श्री. दिगंबर शोभा विठ्ठल नाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवसेना उपनेते विजय आप्पा करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण बंटी तिदमे, योगेश बेलदार, नगरसेविका समीना मेमन आणि संदीप डांहांके यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मा. एकनाथ शिंदे साहेब व मा. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक पातळीवर दिगंबर नाडे यांच्या सततच्या प्रयत्नांचेही नागरिकांनी मनःपूर्वक कौतुक केले.

प्रभागातील सामाजिक बांधिलकी जपणारा व लोकसहभागातून यशस्वी ठरलेला हा उपक्रम इतरांसाठी आदर्शवत ठरला आहे.
