धामोरी एस.टी. बससेवा दिशादर्शक फलकाविना; प्रवाशांची होत आहे तारांबळ

धामोरी – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

कोपरगाव बसआगारातून टाकळी, रवंदे, धामोरी, चासनळी, वडगाव, बक्तरपूर अशा गावांसाठी दिवसातून पाच ते सहा वेळा बससेवा धावते. मात्र, या बसेसवर नामनिर्देश दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते.

फलक नसल्याने बस कुठून आली व कुठे जाणार, हे समजण्यासाठी प्रवाशांना चालक किंवा वाहक यांना विचारावे लागते. परंतु विचारल्यावरही योग्य माहिती मिळेलच, याची खात्री नसते. शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष बसेस असतात, मात्र त्यावरही फलक नसल्याने प्रवासी संभ्रमात पडतात.

प्रवाशांच्या मते, ही परिस्थिती केवळ असुविधा नाही तर प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया घालवणारी आहे. “शिक्षित माणूस अशिक्षित होतो” अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.या संदर्भात धामोरी व परिसरातील प्रवाशांनी कोपरगाव बसआगार प्रमुख अधिकारी व वरिष्ठ बस अधिकारी यांना लवकरात लवकर नामनिर्देश फलक बसविण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!