संग्राम पतसंस्थेच्या आश्वी बु. शाखेचे नूतनीकरण व स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य स्नेहमीलन संपन्न

आश्वी बु. (ता. संगमनेर) – निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर च्या आश्वी बु. शाखेचे नूतनीकरण व भव्य स्नेहमीलन कार्यक्रम शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता स्व. रुपचंद शेठ गांधी मार्केट येथे उत्साहात पार पडला.लोकनेते मा. बाळासाहेब थोरात (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते शाखेच्या नूतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या तीन दशकांच्या यशस्वी प्रवासाला नवी ओळख देत, आधुनिक सुविधा व नव्या लोगो सह शाखा ग्राहकांसाठी सज्ज झाली आहे.

या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते मा. बाळासाहेब थोरात (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. डॉ. सुधीर तांबे (संस्थापक अध्यक्ष, संग्राम पतसंस्था व जयहिंद लोकमंच), मा. सौ. दुर्गाताई तांबे (मा. नगराध्यक्षा, संगमनेर नगरपरिषद) व मा. डॉ. जयश्रीताई थोरात (अध्यक्षा, एकविता फाउंडेशन) यांची उपस्थिती लाभली. यासोबतच सुमतीलाल गांधी, विजयराव हिंगे तसेच बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवरही उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे, ग्राहकसेवेतील सातत्याचे व ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीसाठी घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच नूतनीकरणामुळे शाखेची सेवा अधिक सुलभ व वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी स्वातंत्र्यदिन व शाखा नूतनीकरणाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेली उद्दिष्टपूर्ती ठेवी योजना २५१ दिवसांसाठी ८.५०% व्याजदराने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन श्री. राणीप्रसाद मुढडा, दा. चेअरमन इंजि. विजय गिरी, व्यवस्थापक श्री. उमेश शिंदे, तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी केले.या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने सभासद, ग्राहक, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी संस्थेचे चेअरमन श्री. राणीप्रसाद मुढडा यांनी सर्वांचे आभार मानून, संग्राम पतसंस्थेचा विश्वास व सेवा अशीच कायम राहील, अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!