क्रांतिसूर्य व क्रांतिज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळा 28 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये

नाशिक : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क दत्तात्रय घुले परशुराम सायखेडकर सभागृह, नाशिक येथे येत्या रविवार, दि. 28 सप्टेंबर रोजी “क्रांतिसूर्य व क्रांतिज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळा” संपन्न होणार आहे. या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 105 निवडक शिक्षकांचा तसेच काही निवडक संस्थाचालक व मुख्याध्यापकांचा गौरव केला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. नरहरीजी झिरवाळ (अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून मा. नितीनजी ठाकरे (सरचिटणीस, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, नाशिक) उपस्थित राहतील.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणूनमा. सोमनाथ भिसे (उपसभापती, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर)मा. ओमकार पवार (IAS, जिल्हा परिषद, नाशिक, CEO)मा. किरण लोखंडे (संपादक, दै. पुण्यनगरी)मा. दत्तात्रय कराळे (आय.जी, नाशिक परिक्षेत्र) डाॅ. संजीव सोनवणे (कुलगुरु, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) मा. संजयकुमार राठोड (उपसंचालक शिक्षण, नाशिक) मा. देविदास नांदगावकर (सहायक आयुक्त, समाजकल्याण, नाशिक)हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आहिरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत असून, संस्थेचे अध्यक्ष व अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी सांगितले की, 2016 पासून संस्थेमार्फत साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले गेले आहेत. आतापर्यंत 16 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अकॅडमीतून मार्गदर्शन घेतले असून, त्यातील 1617 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.सोहळ्यात आहिरे अकॅडमी व बिग स्कोर एज्युकेशन कंपनी (Air Rankar Learning Online App) चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था-विशेष अंकाचे प्रकाशन (दै. पुण्यनगरीच्या सहकार्याने) व प्रा. डॉ. आनंद आहिरे यांचे आत्मकथन “मास्तरांना घडविणारा मास्तर” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.“

हा सोहळा म्हणजे शिक्षकांना प्रेरणा देणारा व शिक्षणक्षेत्राला नवी दिशा दाखवणारा एक पर्वणीचा क्षण आहे. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे” असे आवाहन प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!