रेल्वे, महामार्ग, कृषी हब आणि सहकारी विद्यापीठाच्या महत्त्वाच्या मागण्या मांडल्या
लोणी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.श्री.अमितभाई शाह साहेब हे आज लोणी येथे आयोजित भव्य कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसमवेत त्यांची भेट घेऊन संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनात खालील पाच प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या –
नाशिक – पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मधून नेण्यात यावा.
नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH-60) सहा पदरी करण्यात यावा.
महाराष्ट्रातील पहिले सहकारी तत्वावरील विद्यापीठ (Cooperative University) अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करावे.
संगमनेर तालुक्याला कृषी हब (Agriculture Hub) म्हणून विकसित करावे.
संगमनेरमध्ये केंद्र सरकारच्या अधिन कामगार रुग्णालयाच्या स्थापनेस मंजुरी द्यावी.
या सर्व मागण्या पूर्ण झाल्यास संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह साहेबांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील पातळीवर योग्य ती कार्यवाही होईल, असे आमदार खताळ यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार, पालकमंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.श्री. जयकुमारजी गोरे, तसेच आ. शिवाजीराव कर्डिले, आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्रामभैय्या जगताप, आ. आशुतोष काळे, आ. विक्रम पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
