आस्मानी संकटात अडकलेल्या बळीराजासाठी प्रवरा परिवाराचा मदतीचा हात — मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचे योगदान!

प्रवरा परिवाराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचे योगदान

लोणी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्यात यंदा आलेल्या आस्मानी संकटामुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या संकटसमयी त्यांना मदतीचा हात देण्याच्या भावनेतून प्रवरा परिवाराने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी तब्बल एक कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला होता.

आज या निर्णयाची औपचारिक अंमलबजावणी करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे १ कोटी रुपयांचा धनादेश आमचे नेते आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.श्री.अमितभाई शाह यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी पालकमंत्री मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की,

“शेतकऱ्यांच्या दु:खात प्रवरा परिवार सदैव सहभागी राहिला आहे. बळीराजाच्या पुनर्वसनासाठी आणि अडचणीतून बाहेर येण्यासाठी ही छोटीशी मदत प्रेरणादायी ठरेल.”

यावेळी त्यांच्या सोबत श्री.राजेंद्रजी विखे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत प्रवरा परिवाराचे आभार मानले आणि समाजहितासाठी अशा सहकार्याची भावना सर्वांनी जोपासावी, असे आवाहन केले.

या उपक्रमामुळे प्रवरा संस्थेची ‘सेवा, सहकार आणि समाजकार्य’ ही परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!