घारगाव (ता. संगमनेर) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
घारगाव परिसरात घडलेल्या आदिवासी भगिनीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या भयानक घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि आदिवासी बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

या मोर्चात आमदार अमोल खताळ आणि आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी विशेष उपस्थिती लावत समाजबांधवांना न्यायाच्या लढ्यात साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलं – “अशा अमानुष कृत्यांना माफी नाही. दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
”मोर्चादरम्यान “आदिवासी भगिनीला न्याय मिळाला पाहिजे!”, “हिंदू समाज जागा आहे!”, “दोषींना फाशी द्या!” अशा घोषणा देत संतप्त जनसमूहाने प्रशासनाचे लक्ष वेधले.सर्वपक्षीय नेते, समाजसेवक, संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. पोलिस बंदोबस्तात शांततेत मोर्चा पार पडला, मात्र नागरिकांच्या भावना तीव्र होत्या.

मोर्च्यातील मागण्या : पीडित भगिनीला तात्काळ न्याय मिळावा.आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी.महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.सकल हिंदू समाजाने प्रशासनाला निवेदन देऊन “आता सहनशक्ती संपली आहे, अन्यायाविरोधात निर्णायक लढा उभारला जाईल” असा इशारा दिला.

