निर्भीड जनता न्यूजचा दमदार इफेक्ट! “आश्वी येथील खड्ड्यांच्या नरकयात्रेवर ब्रेक! PWD ला जाग आली – खड्डेमुक्ती मोहीम सुरू!”

निर्भीड जनता न्यूजच्या वृत्ताचा जोरदार प्रभाव

आश्वी बुद्रूक गणपती मंदिर–इरिगेशन बंगल ते आश्वी खुर्द श्री स्वामी समर्थ मंदिर मार्गावरील खड्ड्यांच्या डोंगराला उपचार; प्रशासन जागे!

आश्वी बुद्रुक ता. संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

आश्वी बुद्रुकातील गणपती मंदिर, इरिगेशन बंगला मार्गे आश्वी खुर्दच्या श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता आणि प्रवरा नदीवरील पुलाची दयनीय अवस्था निर्भीड जनता न्यूजने अत्यंत प्रभावी आणि धारदार शैलीत समोर आणली. गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या खोल खड्ड्यांचे साम्राज्य, उखडलेला डांबर, धोकादायक पोकळी, रात्री अंधारात दिसत नसलेला जीवघेणा प्रवास—या धोक्यांचे वास्तव निर्भीड जनता न्यूजने व्हिडिओ आणि छायाचित्रांसह जशास तसे दाखवून प्रशासनाला आरसा दाखवला.

गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून या मार्गाची दुरवस्था भयानक स्वरूपात वाढत चालली होती. गणपती मंदिर ते इरिगेशन बंगला, तेथून प्रवरा नदीवरील पूल आणि आश्वी खुर्दच्या श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंतचा संपूर्ण रस्ता जणू खड्ड्यांचे रांजणघर बनला होता. रोज शेकडो विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार या मार्गाने जात असून त्यांचा प्रत्येक प्रवास अक्षरश: जीवावर बेतत होता.

सिमेंटचे तुकडे तुटून लोखंडी रॉड बाहेर पडणे, खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनं घसरणे, रात्री प्रकाशयोजना नसल्याने रस्ता दिसतही नसणे, पुलावर उखडलेला डांबराचा थर—या सर्व संकटामुळे अनेक लहानमोठे अपघात घडत होते. ग्रामस्थांनी तक्रारी, अर्ज, विनंत्या केल्या; पण प्रशासन नेहमीप्रमाणे ‘दुर्लक्षाच्या झोपेत’च.

मात्र – निर्भीड जनता न्यूजने धडक बातमी प्रसिद्ध केल्यानंतरपूरा प्रशासन हलले!

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यंत्रणा, रोलर, खडी आणि साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आज पासून गणपती मंदिर – इरिगेशन बंगला – प्रवरा नदी पूल – श्री स्वामी समर्थ मंदिर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 39;

स्थानिक नागरिकांनी निर्भीड जनता न्यूजचे आभार मानत याला “खऱ्या अर्थाने लोकशाहीत पत्रकारितेचा प्रभाव” असे संबोधले आहे.“महिनोन्महिने आमच्या तक्रारींना प्रतिसाद नव्हता. पण एका धडाकेबाज बातमीने प्रशासन जागे झालं. हे म्हणजे निर्भीड पत्रकारितेची ताकद!” अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या.

ग्रामस्थांनी पुढे पूर्ण रस्ता व पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती, प्रकाशयोजना, चेतावणी फलक आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठीही प्रशासनाने दीर्घकालीन उपाय करावेत, अशी मागणी पुन्हा जोरदारपणे केली आहे.

प्रशासनाने घेतलेली आजची तातडीची कारवाई ही फक्त सुरुवात आहे. रस्ता आणि पुलाची अवस्था अद्याप गंभीर असून संपूर्ण रस्ता दुरुस्त होईपर्यंत ग्रामस्थ सतर्क राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!