आश्वी बुद्रुकमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त केरूजी सगाजी खेमनर यांचे वृद्धापकाळाने निधन

आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

आश्वी बुद्रुक येथील ज्येष्ठ व आदरणीय सामाजिक कार्यकर्त केरूजी सगाजी खेमनर (टेकाडे), वय ८८, यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने आश्वी बुद्रुक परिसरातील सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

केरूजी खेमनर हे सामाजिक बांधिलकी, साधेपणा व लोकहितासाठी केलेल्या कार्यामुळे सर्वत्र परिचित होते. त्यांनी आयुष्यभर समाजासाठी निःस्वार्थपणे सेवा केली. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे व पणतू असा मोठा परिवार आहे.

ते आश्वी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्त चांगदेव खेमनर, चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त बबनराव खेमनर तसेच अशोक खेमनर यांचे वडील होत. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगारातील वाहतूक निरीक्षक गिरीश खेमनर यांचे ते आजोबा होत.

त्यांच्या दशक्रिया विधी सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी आश्वी बुद्रुक येथे होणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अनेक मान्यवरांनी खेमनर कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!