पेमगिरीचा विकासमहाउत्सव! 3 कोटी 28 लाखांच्या निधीतून भव्य कामांचे लोकार्पण – थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठबळाचा ठसा

शहागड व महाकाय वटवृक्षाच्या साक्षीने पेमगिरीच्या विकासाला नवे बळ; परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधीची अखंड धारा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

स्वराज्य संकल्पकाची भूमी असलेल्या पेमगिरी येथील शहागडासह विविध विकास कामांसाठी आपण सातत्याने निधी दिला. त्या निधीमधून राबवलेल्या विविध विकास कामे पेमगिरी हे आदर्श गाव ठरले असून निळवंडे कालव्याच्या वरील भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे याचबरोबर पेमगिरी गावांमध्ये 3 कोटी 28 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण त्यांनी केला.

पेमगिरी येथे पेमगिरी शहागड तटबंदीचे बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, शाळांच्या वर्ग खोल्या, सभागृह ,पूल ,अंगणवाडी इमारत, सौर दिवे, सोलर प्रकल्प व अभ्यासिकेचे लोकार्पण माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी मा आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर ॲड माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, सोमनाथ गोडसे रावसाहेब डूबे ,शांताराम डूबे, सरपंच द्वारकाबाई डूबे, उपसरपंच शालन चव्हाण, बाळासाहेब मस्के प्रतापराव डूबे विलास कवडे, रमेश गुंजाळ, संतोष मांडेकर, विनोद हासे, मनीष गोपाळे, भास्कर गोपाळे, दीपक कानवडे, मारुती कवडे यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की पेमगिरी गावच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी दिला मोरदरा धरण ते गावातील विकास काम हे गावच्या विकासात अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. याचबरोबर ऐतिहासिक शहागड व महाकाय वटवृक्षाच्या विकासासाठी ही आपण निधी दिला. सध्या शासन घोषणा करते मात्र त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. जिल्हा परिषदेची शाळांमधून विद्यार्थ्यांना अत्यंत चांगले शिक्षण दिले जात असून अनेक शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे आपण शिक्षण मंत्री असताना शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला मात्र सध्या सरकारचे धोरण उदासीन आहे. पेमगिरी गावातील महिलांनी बचत गटातून मोठे संघटन केले असून महिलांना काँग्रेसने आरक्षण दिले आहे महिलांच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे.

निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले असून कालव्याच्या वरच्या भागाला पाणी देण्याची सुद्धा नियोजन केले होते. कालव्याच्या वरील भागातील शेतकऱ्यांना सुद्धा पाणी तातडीने द्यावी अशी मागणी त्यांनी केली असून 40 वर्षात हा संगमनेर तालुका उभा केला यामध्ये जनतेची मोठी साथ मिळाली. सतत विकास कामांमुळे आज संगमनेर तालुका राज्यात अग्रगण्य ठरला असल्याचे ते म्हणाले.

तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अथक प्रयत्नातून तालुका उभा केला आज संगमनेर तालुका सहकार शिक्षण समाजकारण शेती अशा सर्व क्षेत्रात राज्याला दिशादर्शक आहे. हे काम एका दिवसात नव्हे तर 40 वर्षातील परिश्रमाचे फळ आहे हा तालुका आपल्याला जपायचा असून सर्वांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ गोडसे यांनी केले तर शांताराम डूबे यांनी आभार मानले यावेळी गावातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!