आश्वी खुर्द (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे एकता समितीच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन एकता समितीचे अध्यक्ष शरद भडकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात गावातील नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांनी विचारप्रवर्तक भाषण करत सांगितले,
“अण्णाभाऊ साठे हे समाजाच्या दुःखद कथा ज्या थेट अंत:करणाला भिडतात अशा शब्दांत मांडणारे लोककवी होते. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून वंचित वर्गाच्या भावना, आशा-निराशा यांना शब्दरूप दिले. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपण समाज परिवर्तनाची चळवळ पुढे नेतली पाहिजे.”
अध्यक्ष शरद भडकवाड यांनी सांगितले की,
“आजही समाजात विषमता, अन्याय, आणि भेदभाव आढळतो. अण्णाभाऊंचा लढा या गोष्टींविरुद्ध होता. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून आपण समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे:
ऍडव्होकेट शेळके, आकाश भडकवाड, राजेश भडकवाड, कैलास भडकवाड, सचिन बोरुडे, संतोष भडकवाड, संतोष बर्डे, संजय भडकवाड, सागर भडकवाड, संदीप भडकवाड, तुळशीराम भडकवाड, संजय भोसले, अनिल भोसले, सोपान सोनवणे, विशाल भडकवाड, किरण भडकवाड, मयूर भडकवाड, सचिन भडकवाड, सचिन राक्षे, महेश घोयल, गणेश घोयल, प्रकाश भडकवाड, राहुल भडकवाड, राहुल शिरतार यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
