आश्वी (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पार्टी – शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने “महारक्तदान संकल्प” उपक्रमांतर्गत एक दिवसीय भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन २२ जुलै २०२५ रोजी करण्यात आले आहे.
शिर्डी, राहाता, कोल्हार आणि आश्वी या ठिकाणी मंडलनिहाय हे शिबिरे भरवण्यात येणार असून, “एक थेंब रक्त, एक जीवनदान” या संकल्पनेतून नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.शिबिरांचे वेळापत्रक:
🔴 शिर्डी शहर – हॉटेल संस्कृती, शिर्डी.🕙 वेळ – सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.००
🔴 राहाता – श्री साईबाबा मंदिर, जुनी गढी , राहता.🕘 वेळ – सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.००
🔴 कोल्हार – जनसेवा कार्यालय, लोणी.🕘 वेळ – सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.००
🔴 आश्वी – पुष्पभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील सभागृह, श्री दत्त मंदिर जोर्वे.🕘 वेळ – सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.००
या उपक्रमातून रक्तसंकटावर मात करून समाजात जीवनदानाचा संदेश पोहचविण्याचा भाजपाचा उद्देश आहे. शिबिरांचे यश सुनिश्चित करण्यासाठी कार्यकर्ते आणि डॉक्टरांचे संघ सज्ज आहेत.
