धामोरी येथील जिल्हा परिषद शाळेत संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने वह्यांचे वाटप

धामोरी येथील जिल्हा परिषद शाळेत संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने वह्यांचे वाटप

धामोरी (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. ही उपक्रम संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त मा.श्री. बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या शुभअवसरानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमावेळी संजीवनी उद्योग समूहाचे कैलासराव माळी, आप्पासाहेब गलांडे, रावसाहेब मांजरे, विजय साळुंखे, दादासाहेब जगझाप, भाऊसाहेब नाजगड, पेखळे, संदीपराव आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे एस. के. आणि शिक्षक लामखडे एम. एन., रणदिवे एस. के., पवार एन. आर., राठोड एस. एम., शिंगाडे ए. जे., दिघे बी. पी., साबळे डी. एल., भोसले एस. एस. मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक आत्मविश्वास निर्माण झाला असून, संजीवनी समूहाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!