आश्वी खुर्द (ता. संगमनेर) –गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. भागवत गणपत गायकवाड (भडकवाड) यांचे आज (दि. ५ ऑगस्ट २०२५) रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अंदाजे ८२ वर्षे होते.
त्यांच्या पार्थिवावर दिनांक ६ ऑगस्ट २०२५, बुधवार रोजी सकाळी ९.३० वाजता प्रवरातिरी, आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै.भागवत गायकवाड हे हभप सचिन महाराज गायकवाड (भडकवाड) व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख विकास गायकवाड (भडकवाड) यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते अत्यंत मनमिळावू, समाजभिमुख आणि धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.ॐ शांतिः शांतिः शांतिः… 💐
