धामोरी- निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी नाभिक समाजातील सुप्रसिद्ध सलून व्यावसायिक कै. मारुती लखुजी कदम (वय ६९) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन मुली, एक मुलगा, सुन, नातू-नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. मारुती कदम हे धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नारायण कडवे तसेच नांदगाव येथील सुनील वसंतराव निकम यांचे ते मामा होत.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
