मंत्रालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध व वक्तशीर नेतृत्वास अखेरचा मान

मुंबई : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, निष्ठा व कर्तव्यभावनेने शासकीय कामकाज पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी व्यक्त केली.

या शोकसभेस मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय, डॉ. हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस. चोक्कलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संतोष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भोज, अंशु सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन, हे दु:ख सहन करण्याचे बळ त्यांना लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. शोकसभेदरम्यान उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!