शेकटा शाळेत शिवजयंतीचा उत्सव; चिमुकल्यांच्या कलाविष्काराने रंगले शिवमय वातावरण

दिनांक. 20 फेब्रुवारी 2026

गीत, नृत्य, लेझीम व भाषणातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

गंगापूर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेकटा, ता. गंगापूर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गीतगायन, भाषण, लेझीम आणि नृत्य अशा विविध कलाविष्कारांच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकून घेतली. संपूर्ण शाळा परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व अर्थ व बांधकाम सभापती मा. श्री. संतोष भाऊ जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शगीर शेख व माजी अध्यक्ष श्री. अशोक जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले तसेच शिवरायांच्या शौर्य, धैर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि आदर्श नेतृत्वगुण यांची महती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवगीते, प्रेरणादायी भाषणे, जोशपूर्ण लेझीम व आकर्षक नृत्यप्रकारांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. चिमुकल्या कलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने पालक व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका श्रीम. झेलाटे मिलानी, मुख्याध्यापिका श्रीम. शेवाळे वर्षाराणी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच माजी केंद्रप्रमुख श्री. ए. एम. शेख, ग्रामपंचायत सदस्य श्री. भाऊसाहेब गायकवाड, श्री. युवराज जाधव, श्री. अब्बास शेख, श्री. नारायण राजपूत, श्री. रफिक पटेल, श्री. नाशिर पठाण, श्री. रईस पटेल, श्री. हाकिम पटेल, श्री. खंडू शिंदे, श्री. धनराज जाधव, श्री. अनिल जाधव, श्री. मुस्ताक शेख, श्री. ईम्रान पठाण, श्री. अनिल शिंदे, श्री. शाहेद पटेल, श्री. नरोडे मामा यांच्यासह असंख्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार, इतिहासाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी यांचा जागर झाला असून शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!