श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या शहीदी समागमानिमित्त भव्य सायकल रॅली

दिनांक.23 फेब्रुवारी 2026 सोमवार

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते शुभारंभ; सेवाभाव व आरोग्याचा संदेश

अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित भव्य सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, बलदेव सिंग वाही, अमरप्रीत वाही, अमनदीप वाही, अश्विंदर मल्होत्रा, ब्रह्मा लोंगियानी, मोंटू लोंगियानी, इकजस नारंग, गुरजस नारंग, हरप्रीत नारंग, कुलबीर सिंग वाही, रविंदर सिंग नारंग यांच्यासह विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरू झालेली ही रॅली सुरभी हॉस्पिटल, गुलमोहर पोलीस चौकी, श्रीराम चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, नायरा पेट्रोल पंप, दिल्ली गेट, मार्केट यार्ड, कोटला स्टँड आणि डीएसपी चौक मार्गे मार्गक्रमण करत भाई दया सिंह जी गुरुद्वारा येथे पोहोचली. तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.
या सायकल रॅलीमध्ये युवक-युवती, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था व सायकलिंग क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “निरोगी राहा, सायकल चालवा”, “धर्म, एकता आणि सेवाभाव” असा सकारात्मक संदेश देत ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली.

या उपक्रमामुळे समाजामध्ये आरोग्य, सामाजिक सलोखा, शिस्त आणि सेवाभाव याबाबत जागृती निर्माण झाली असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक एकता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी अनेक सहभागी नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!